PYQPulse
HomeMocksPracticePYQsUpdatesDashboard
PYQPulse

Timing-accurate mock tests and PYQs for SSC, Banking and Railway exams — so the real paper feels like a revision.

Exams

  • SSC exams
  • Banking exams
  • Railway exams
  • All exams

Practice

  • Practice questions
  • Mock test series
  • Sectional tests
  • Year-wise PYQs
  • Performance analytics

Company

  • About us
  • Help Centre
  • Pricing
  • Sign in

Legal

  • Privacy Policy
  • Terms of Service

Contact

  • hello@testwala.co.in
  • Telegram
  • +91 62816 87760

Practice interface modeled on the official exam pattern — not the official examination. PYQPulse is not affiliated with the Staff Selection Commission, IBPS, SBI, RBI, NABARD, SEBI or Indian Railways.

© 2026 PYQPulse. All rights reserved.

Built for aspirants, by aspirants.

HomeMocksPracticeStats
  1. Home
  2. ›
  3. PYQs
  4. ›
  5. MPSC State Service
  6. ›
  7. 2019 (CSAT)
  8. ›
  9. Q46

MPSC State Service 2019 · CSAT · Question 46 of 72

Passage: प्राचीन भारतीय ग्रंथात आदिवासींचा उल्लेख अरण्यात राहणारे म्हणून ‘अरण्यक’ असा के ला आहे. इथले हे मूळ निवासी, दुर्गम अशा पहाडी प्रदेशात राहतात म्हणून त्यांचा उल्लेख गिरिजन, वनवासी असाही के ला जातो. भारतात अशा सुमारे 400 आदिवासी जमातींची नोंद आहे. रानातली कं दमुळं आणि जंगलातल्या आपल्या वाटेला आलेल्या जमिनीवर ते आपली उपजीविका करतात. याशिवाय त्यांना उपजीविके साठी दुसरं साधन नाही. दऱ्याखोऱ्यात वस्ती करून राहणार्‍या या आदिवासींची संस्कृ ती नागर संस्कृ तीपेक्षा वेगळी आहे. त्यांच्या आजूबाजूला निसर्ग आहे. त्यामुळे ते निसर्गपूजक आहेत. श्रद्धाळू आहेत आणि अंधश्रद्धही आहेत. देव, भगत, जादू टोणा यांचा पगडा त्यांच्यावर आहे. निसर्गावर निरतिशय प्रेम करणार्‍या आदिवासींमध्ये वर्णभेद नाही. उच्चनीच नाही. जंगलाचा राजा संबोधणारा हा समाज नि: स्वार्थीपणा, प्रामाणिकपणा या मूल्यांची जपणूक करत प्रतिकू ल परिस्थितीतही आपली संस्कृ ती टिकवून आहे. आदिवासी बोलीभाषा, वेषभूषा, आचार-विचार, जीवन व्यवहार, चालीरिती हीच त्यांची संस्कृ ती. त्यांचे सण-उत्सव, देवदेवतांचे पूजाविधी, जन्म-मरण विधी यातून त्यांच्या जीवन व्यवहारांची ओळख होते. पिढ्यान्‌पिढ्या अस्तित्वात असलेली आपली संस्कृ ती त्यांनी जपली आहे हे विशेष होय. बोहडासारखा उत्सव, तारपा नृत्य जागतिक स्तरावर पोचलेली वारली चित्रकला आदीतून अभिव्यक्त होणारी त्यांची जीवनशैली भारतीय लोकसंस्कृ तीचे वैभव आहे. आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. गोविंद गारे यांनी अनेक वर्षें आदिवासींवर संशोधन के ले. त्यांनी म्हटले आहे की, “पृथ्वीवर जेव्हा कु ठलीच संस्कृ ती उदयाला आली नव्हती तेव्हा आदिवासी संस्कृ ती सुखाने नांदत होती. आर्याच्या आगमनाने या संस्कृ तीला तडा गेला. ” यूरोप, मध्य आशियातून खैबर खिंडीमार्गे आलेल्या आर्यांनी भारतावर आक्रमण करून इथे राहणाऱ्या आदिवासींवर हल्ला करून त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आणि त्यांना हाकलून लावले. आपल्या जमिनी गमावलेले इथले मूळ निवासी जीव वाचवून जंगलात आश्रयाला गेले. निसर्गाच्या सानिध्यात डोंगर-दऱ्यात राहू लागले. त्यांची जीवनशैली बदलली. खरे तर मूळ जमिनीचे ते मालक पण त्यांच्या नशिबी असा वनवास आला. पण आहे त्या परिस्थितीशीही तडजोड करून ते जंगलात राहू लागले. या आदिवासींना ‘आदिम’ असेही म्हटले जाते. या आदिवासी समाजाची एक भाषा नाही. हे आदिवासी अनेक समाजगटात विखुरले आहेत. या प्रत्येक समाजाची बोली भाषा वेगळी आहे. या भाषांना लिपी नाही. ही एक मोठी अडचण आहे. एकट्या महाराष्ट्राचाच विचार के ला तर एकू ण लोकसंख्येच्या 9 - 5 टक्‍के आदिवासी महाराष्ट्रात आहेत. कोरकू , वारली, ठाकर, कोकणा, गोंड, माडिया, काथोडी, महादेव कोळी, परधार, मथवाडी, भिल्ल, कातकरी अशा अनेक आदिवासी जमातींची नावे डोळ्यापुढे येतात. बाह्य जगाशी फारसा संबंध न येणारे हे आदिवासी एकविसाव्या शतकातही डोंगर दऱ्यातच वास्तव्य करत आहेत. अरण्यक, गिरीजन, वनवासी, आदिम यातीलं शब्दश: समान अर्थ असणारे शब्द कोणते? अ. अरण्यक - आदिम ब. वनवासी - गिरीजन क. अरण्यक - वनवासी ड़. वनवासी - आदिम पर्यायी उत्तरे :

Marathi Comprehension

  1. Aफक्त अ आणि क
  2. Bफक्त ड
  3. Cफक्त क
  4. Dफक्‍त बCorrect

Answer: D. फक्‍त ब

Explanation

Per the official key, option (d) is correct.

Source: MPSC Rajyaseva Prelims 2019 – CSAT Paper II (Set A), official paper

← Q45View full paper (72 questions)Q47 →

Practice the full MPSC State Service 2019 paper

Timed test with all 72 questions, just like the real exam.

Start test